*शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांची नाणारमध्ये 'वाघ गर्जना'*
नाणार प्रकल्प होऊ देणार नाही !
भूसंपादन होणार नाही म्हणजे प्रकल्पच होणार नाही
हा प्रकल्प गुजरातला न्यायचा आहे तर घेऊन जा,माझ्या कोकणाचं मी गुजरात होऊ देणार नाही
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत कवडीची किंमत दिली जात नाही
कोकणाला समुद्र किनारा लाभलाय, निसर्ग लाभलाय हा काय आमचा गुन्हा आहे ?
नाणार जमिनीचा व्यवहार हा भूमाफियांचा घोटाळा !
जमिनींची मोजणी करायला येणाऱ्यांना आडवा, तुमच्या पद्धतीने आडवा !
आज आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो आहे, पण तुम्ही जुलूम केला तर आम्हाला देखील बेकायदेशीर मार्गाने जावं लागेल !
तुम्ही आमच्या जमिनी खरेदी करु शकता पण आमच्यातील देशभक्ती तुम्ही खरेदी करु शकणार नाही !
सत्तेत असलो तरी ताटाखालचं मांजर झालो नाही, आमच्यातील वाघ जिवंत आहे !
إرسال تعليق