आज-काल आमच्या पक्षात इनकमिंग खूप वाढलय.कोण मनसे मधून येत आहे...कोण राष्ट्रवादीमधून येत आहे...कोण आमुक पक्षातून येत आहे तर कोण तमुक पक्षातून येत आहे.परंतू मी त्यांना सांगू इच्छ्तो कि स्वार्थी भावनेने जर तुम्ही शिवसेनेत येत असाल..! पुढील महानगरपालिका,आमदारकी,खासदारकी डोळ्यासमोर ठेवून तुम्ही शिवसेनेत येत असाल..तिकिट मिळेल या भावनेने तुम्ही शिवसेनेत प्रवेश करीत असाल तर तुम्ही आमच्या पक्षात येऊच नका...!! तुमची काही गरज नाही आम्हाला...!!हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबांवर प्रेम करणारा शिवसैनिक हातात भगवा झेंडा आणि डोक्यात हिंदूत्वाची आग पेटवून आहोरात्र शिवसेनेसाठी जन्मापासून झटतो आहे.तोच खरा शिवसेनेचा वारसदार आहे.तुमच्यासारखे लोक शिवसेनेत येतात तिकिट मिळवितात आणि सत्ता बदल झाली तर उलटी टांग मारतात हा आजपर्यंतचा इतिहास आहे.आणि इतिहास कधी बदलत नसतो.इतिहासाला जरी पंख असले असते तरी त्याला उडता आले नसते..!!
....................................................
अखेर सच्चा शिवसैनिकाची वेळोवेळी गळचेपी झाली आहे.कोणाला शिवसेनेत यायच असेल तर सर्वप्रथम भगव्या झेंड्याला आणि शिवरायांच्या पावलांना स्पर्श करून शपथ घ्या कि, "आम्ही शिवसेनेत आलो आहोत..! शिवरायांचा हा भगवा झेंडा आमच्या बंडखोरीने कधी बदनाम होणार नाही आणि हिंदू धर्माचा हा भगवा झेंडा मरेपर्यंत हातातून कधीच अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही",अशी शिवरायांना वंदन करून हिंदूह्रदयसम्राटांच्या प्रतिमेला साद घालून त्यांना अभिवादन करून शपथ घेतली तरच तुम्ही खरे शिवसैनिक बनाल...!!
....................................................
आज या पक्षात उद्या त्या पक्षात करीत बसाल तर तुमच्या जिंदगिला अर्थच उरणार नाही.जिवनाला दिशा द्यायचीच असेल तर तुम्ही एकनिष्ट असायला हवं भले तुमचा पक्ष कोणता का असेना..!!
मी एक शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकाच कर्तव्य मी माझ्या परीने पार पाडत आहे.पद,पैसा,खुर्ची,या सगळ्या गोष्टी मर्यादीत आहेत पण माझ शिवसैनिक हे पद अमर्यादित आहे.जसा सागराला किनारा नसतो तसा शिवसैनिकांचा कधीच शेवट नसतो तो अथांग आहे.
......................जय महाराष्ट्र................
अतुल श्रावण भवर,सोलापूर.
मो.नं.9960090001.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
إرسال تعليق