वसई : भाजपनं श्रीनिवास वनगांना उमेदवारी दिली असती तर आज मी भाजपचा प्रचार करण्यासाठी इथे आलो असतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या जाहीर भाषणाची सुरुवात केली. वनगा कुटुंबीयांच्या अश्रुंना न्याय देण्यासाठी मी आज या निवडणूक मैदानात प्रचारासाठी दाखल झालोय, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
◆काय म्हणाले उद्धव ठाकरे...◆
● वनगा परिवाराच्या आश्रूंना न्याय द्यायला मी इथं आलो आहे.
● मुख्यमंत्री म्हणतात शिवसेनेने पाठीत वार केला पण हे बोलण्याचा त्यांना अधिकार आहे का? त्यांनी लोकसभा निवडणूक आधीच येणार हे माहित असतानाच त्यांनी गावित यांच्याशी बोलून ठेवले, मग त्यांनी श्रीनिवास वनगा यांना का सांगितले नाही, मुख्यमंत्री म्हणतात आमच्या मनात होते मग तुम्ही मोदींसारखे रेडिओवर का नाही बोलत.
● इतर पक्षातून उमेदवार तुम्हाला आयात करावे लागतात, चिंतन शिबिरातील नेते कुठे गेले?
● आम्ही माणसं फोडणारे नाहीत, माणसं आमच्याकडे प्रेमाने येतात.
● ह्यांच्याकडे उमेदवार स्वतःचा नाही, प्रचारासाठी माणसे बाहेरून मागवावी लागतात हाच तुमचा पराभव आहे.
● स्वत:चा लोकसभा मतदारसंघ राखू शकला नाही, असा मुख्यमंत्री इथे येऊन मार्गदर्शन करतोय.
● साध्या आदिवासी पोराला पाडण्यासाठी संपूर्ण बीजेपी इथं तुम्हाला आणावं लागत आहे.
● मातोश्रीचे दरवाजे श्रीनिवास वनगासाठी कधीच बंद होणे शक्य नाही कारण आम्हावर शिवसेनाप्रमुख व माँ साहेबांचे संस्कार आहेत.
● आता लोक पुढच्या निवडणुकीची वाट पाहतायत, आता अबकी बार नाही यांचा फुसका बार..
● इथली माणसे रोज लोकलने प्रवास करून मुंबईला येतात आणि परत रात्री येतात..हाडामांसाची माणसे त्यांना इथले कोणी त्रास देत असतील तर मला बळाचा वापर करावा लागेल, इथे कोणी सामान्य माणसांना बळाचा वापर करून त्रास देत असेल तर मग मलाही त्यांना काल रिटा बहुगुणा म्हटल्या त्या प्रमाणे वागावे लागेल.
إرسال تعليق