मुंबई :- आपण राजकारणात पाहतो आहे की, सत्तेत आल्यावर कुत्राही स्वत:ला वाघ समजायला लागतो, असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
उद्धव ठाकरे यांनी पालघरच्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांच्या आवाजाची एक आॅडिओ क्लिप सर्वांना एेकवली होती. त्यावर शिवसेनेने ती आॅडिओ क्लिप मोडून तोडून सादर केली आहे. क्लिपची सुरवातीची आणि शेवटची वाक्ये शिवसेनेने एेकवली असती तर शिवसेना तोंडावर पडली असती. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुपच अहंकारी आहेत, असं देखील राऊत म्हणाले.
إرسال تعليق