योंगोन : म्यानमार मध्ये 25 ऑगस्ट 2017 मध्ये झालेल्या भीषण हिंसाचारात रोहिंग्या दहशतवाद्यांकडून 53 हिंदूंची हत्या करण्यात आली होती. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. म्यानमारमधील रखाइन प्रांतात खा मॉंग सेक या खेड्यात अकारान रोहिंग्या सॅल्वेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी हिंदूंची हत्या केली होती. एएफपी या वृत्तसंस्थेने सर्वप्रथम या घटनेसंदर्भातील वृत्त दिले होते. मात्र, म्यानमारमधील लष्कराने हा दावा फेटाळून लावला होता. परंतु, अॅम्नेस्टी इंटनॅशनलच्या अहवालामुळे या हत्याकांडाला दुजोरा मिळाला आहे. यातून म्यानमारमधील हिंसाचाराचे भयंकर स्वरून पुन्हा समोर आले आहे.
म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिम आणि लष्करांमध्ये तणाव निर्मा झाला होता. यामुळे तिथे मोठी समस्या निर्माण झाली होती. रोहिंग्यांच्या महिलांवर म्यानमार लष्कराकून अत्याचार करण्यात आले होते. लाखो रोहिंग्या मुस्लिमांना स्थलांतर करावे लागले होते. यातील हजारो स्थलांतरित भारतातही आले होते. असे, असले तरी अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालातून नवीनच माहिती पुढे आली आहे.
अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी या रोहिंग्यांच्या सशस्त्र गटाने हिंदू बहुल लोकसंख्या असलेल्या गावावर हल्ला केला. गावातील ५३ जणांना पकडून पर्वताकडे घेऊन जाण्यात आले. त्यानंतर निर्दयपणे त्यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांचे मृतदेह तीन मोठ्या खड्ड्यांमध्ये फेकून देण्यात आले होते. या गावातील सुमारे 46 हिंदू आजूनही बेपत्ता आहेत. त्यांचे पुढे काय झाले कोणालाच माहित नाही. असे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या तिराना हसन यांनी सांगितले.
إرسال تعليق