संभाजीनगर
नगरसेवक तसेच युवासेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ यांना ताब्यात घेण्यावरून आज संभाजीनगरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. धर्मांध मुसलमानांनी भडकावलेल्या दंगलीत हिंदूची कत्तल करण्याचा डाव शिवसैनिकांनी उधळून लावला होता. युवासेना राजेंद्र जंजाळ हे त्यांच्या सहकाऱ्यांसह दंगलीच्यावेळीस रस्त्यावर उतरले आणि अनेकांची जीव वाचवले. अशा या हिम्मतवान व्यक्तीचा सत्कार करण्याऐवजी त्याला अटक करण्याचे संताप आणणारे कृत्य पोलिसांनी केले आहे. या संतापाचा कडेलोट तेव्हा झाला जेव्हा पोलीस या दंगलीचा खरा सूत्रधार असल्याचा ठाम संशय असलेला फिरोज खान हा पळून गेला. पोलीस त्याला पकडण्यासाठी त्याच्या घरी गेले होते, मात्र फिरोज पळून गेला असल्याने त्यांना हात हलवत परत यावं लागलं.

राजेंद्र जंजाळ यांना ताब्यात घेण्यासाठी जवळपास ३०० पोलीस आले होते. दंगानियंत्रण पथक, वज्र अशा वेगवेगळ्या तुकड्या तसेच ४ डीवायएसपींच्या हाताखाली हे पोलीस जंजाळ यांच्या घराजवळ आले होते. दहशतवाद्याला पकडण्यासाठी ज्या तयारीने पोलीस जातात तशाच पद्धतीने जंजाळ यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस आले होते.

जंजाळ यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस येत असल्याची माहिती मिळताच महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात  आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक  जंजाळ यांच्या निवासस्थानाजवळ पोहोचले होते. सामान्य नागरिकही जंजाळ यांना ताब्यात घेण्यास विरोध करण्यासाठी जमले होते. पोलिसांनी या जमावाला शांत करण्यासाठी सांगितलं की आम्ही जंजाळ यांना अटक करणार नसून त्यांना फक्त ताब्यात घेण्यासाठी आलो आहे. मात्र शिवसैनिक आणि नागरिकांचा पोलिसांवर विश्वास राहीलेला नसल्याने  त्यांनी पोलिसांच्या गाडीसमोर आडवे होते जंजाळ यांना ताब्यात घेण्यास विरोध केला. अखेर कसंबसं पोलिसांनी जंजाळ यांना ताब्यात घेतले आणि क्रांती चौक पोलीस ठाण्यात आणले.

गेल्या शुक्रवारी जेव्हा दंगल झाली तेव्हा पोलिसांचं शहरात कुठेही व्हिडीओ शूटींग सुरू नव्हतं, आज मात्र जंजाळ यांना ताब्यात घेण्यासाठी चार कॅमेरे शूटींगसाठी लावण्यात आले होते. अखेर नागरिकांना जी भीती वाटत होती ती खरी ठरली, जंजाळ यांना ताब्यात घेण्यासाठी आलोय असं सांगणारे पोलीस खोटं बोलले , कारण क्रांती चौक पोलीस ठाण्यात नेऊन जंजाळ यांना अटक करण्यात आली.

Post a Comment

أحدث أقدم