मुंबई : "काळं मांजर आडवं आलं तरी महाराष्ट्रात प्लास्टिकबंदी होणारच' असे सांगत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या टीकेला जशासतसे उत्तर दिले.
प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाबाबत पत्रकारपरिषदेत बोलताना राज यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, की एखाद्याला आलेला झटका हे राज्याचं धोरण होऊ शकत नाही. प्लॅस्टिक बंदीचा निर्णय जर रामदास कदमांनी घेतलेला असेल त्याची उत्तरेही त्यांनीच दिली पाहिजेत. त्यांनी आमच्या नात्यावर बोलू नये प्लॅस्टिक बाबत काय करायचे आणि काय करायचे नाही हे कदम यांनी ठरवावे. इतका महत्त्वाचा निर्णय जर घेतला असेल आणि त्याला विरोध होत असेल तर त्याची उत्तरे देण्याची जबाबदारी मंत्री म्हणून कदमांची आहे. मला कोणाशी काही देणं घेणं नाही. विनाकारण हा विषय दुसरीकडे घेऊन जायचे कारण नाही. आमच्या नात्यावर त्यांनी बोलू नये.''
राज यांना उत्तर देताना कदम म्हणाले, की निर्णय हे मंत्रीमंडळाच्या बैठकीत होत असतात, ज्याचे नेतृत्व मुख्यमंत्र्यांकडे असते. राज ठाकरे यांना फक्त निवडणुका आणि पैसाच दिसतो. काही होवो काळं मांजर आडवं आलं तरी महाराष्ट्रात प्लास्टिकबंदी होणारच. ही बंदी कोणत्याही परिस्थितीत मागे घेतली जाणार नाही.
1)Raj thackeray na vichara
ردحذفToll andolanch kay zal kiti madhe fix zale
2)jodha akbar cinema madhe kiti ghetale
3)ha raj thackeray swarthi aahe jyan sahebanna tras dila tyachyakadun
maharashtra ne kay apeksha thevayachya
4)raj tackaray mhanje ek manoranjan karanari vyakti mhanun shillak rahili aahe adv nandkishor Khondale Yuvasena taluka adhikari Nandura dist-buldhana
إرسال تعليق