◆ काही काळापूर्वी पुण्यात कालवा फुटून घरात पाणी शिरल्याने एका कुटुंबाचे दीड लाखांचे नुकसान झाले, हे पैसे ऍडमिशन साठी जमवलेले होते त्यामुळे ते वाहून गेल्याने ऍडमिशन कशी घेणार हा मोठा प्रश्न त्या कुटुंबासमोर होता, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नीलम गोर्हे यांना सांगून या कुटुंबाला आर्थिक मदत केली आणि हा प्रश्न सोडवला
◆ अमरावती मधील शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कुटुंबाकडे लक्ष देण्याची विनंती पत्रात केली होती. आत्महत्येची टोकाची भूमिका घेताना देखील त्यांचा शिवसेनेवर विश्वास होता ही शिवसेनेची सर्वात मोठी जबाबदारी आहे , उद्धव ठाकरे संवेदनशील असल्याने  मदत नक्की करतीलच , भीती एकच आहे ही कुटुंबाचा विचार करून आपल्या जिवंतपणी त्यांना काही मिळालं नाही तर आपल्या मरणाने तरी त्यांना काहीतरी मिळावं असा विचार करून अनेक जण हे पाऊल उचलू शकता.

◆ पुण्यात होर्डिंग पडून दुर्गटनाग्रस्त झालेल्या  स्व. शिवाजी परदेशी यांच्या कुटुंबाला आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी आर्थिक आधार दिला.

◆ खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक हजार दिव्यांग व्यक्तींना उपयुक्त कृत्रिम सामग्री उपलब्ध करून दिली , मंदाताई आमटे आणि प्रकाश आमटे या दोघांच्या हस्ते हे साहित्य विविध गरजूना देण्यात आले. 

◆ मंत्रिमंडळ बैठकांना शिवसेनेच्या उपस्थिती आणि तयारी जास्त आहे, त्यामुळे यात मुळीच आश्चर्य नाही की सेनेचे मंत्री कमी असूनही त्यांनी प्रत्यक्षात राबवलेल्या योजना जास्त आहेत, शिवसेनेच्या मंत्र्यांचा कारभार अन्य कोणत्याही पक्षापेक्षा भ्रष्टाचारमुक्त आहे.

2 Comments

Post a Comment

Previous Post Next Post