shivsenapalgharjilha

वाडा तालुक्यातील पूर्व विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत  शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.
तालुकाप्रमुख उमेश पठारे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष गणपत दोडे, एकूण ९ सदस्य संख्या असलेल्या ओगदा ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर राथड, उपसरपंच देवराम दोरे यांच्यासह इतर पाच ग्रामपंचायत सदस्यांनी, मांडवा व कासघर येथील संतोष नाईक, हेमंत नाईक, अतुल नाईक, विशाल नाईक, जयेश नाईक, विक्रांत पाटील, सुरेश पाटील, दिनेश राऊत, कांतीलाल मराडे आदी कार्यकर्त्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे तालुक्यातील पूर्व विभागातील शिवसेनेची ताकत अधिकच वाढणार असल्याचे उमेश पठारे यांनी यावेळी सांगितले.
या प्रवेशावेळी शिवसेनेचे पालघर उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, उपतालुकाप्रमुख भगवान भोईर, एकनाथ पाटील, भारतीय विद्यार्थी सेनेचे रोहिदास शेलार, जिल्हा परिषद सदस्य भालचंद्र खोडका, पंचायत समिती सदस्य माणिक म्हसरा, विभाग प्रमुख जितू कोर, सदानंद थोरात आदि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم