ठाणे : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच ठाणे जिल्हा परिषदेवर भगवा फडकण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज नियोजन भवनमध्ये निवडणूक होत असून, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाल्याचे समजते. अध्यक्षपदासाठी शहापूर तालुक्यातील मंजुषा जाधव यांची, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुभाष पवार यांची निवड निश्चित असल्याचे मानले जात आहे.
जिल्हा परिषदेतील 53 पैकी सर्वाधिक 26 जागा शिवसेनेकडे आहेत. तर भाजपकडे 15, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 10, भाजप पुरस्कृत एक आणि कॉंग्रेसचा एक सदस्य आहे. या निवडणुकीत अध्यक्षपद मिळविण्यासाठी शिवसेनेचे संपर्कनेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे. त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू होती.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद निश्चित करण्यासाठी शिवसेनेने शहापूर पंचायत समितीचे उपसभापतिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिले होते. त्याचबरोबर कल्याणमध्येही राष्ट्रवादी कॉंग्रेसला पंचायत समितीचे सभापतिपद प्रदान करण्यात आले. त्यातून शिवसेनेने जिल्हा परिषदेतील विजय निश्चित केला असल्याची चर्चा आहे.
भिवंडी पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने कॉंग्रेसच्या दोन सदस्यांना गळाला लावत सभापतिपद पटकावले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी चुरस होती; मात्र आता शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडीवर अंतिम शिक्कामोर्तब केले असल्याचे समजते.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिला सदस्यासाठी राखीव आहे. या पदासाठी शहापूर गटातील मंजुषा जाधव यांची, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुभाष पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 10 सदस्य असून, त्यांची भूमिका निर्णायक आहे.
إرسال تعليق