युवा सैनिकांचे स्फूर्तिस्थान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मंगळवारी ९ जानेवारी रोजी खेड दौऱ्यावर येत असल्याने युवासैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. खेड येथील योगीता दंत महाविद्यालयात सकाळी १०.३० वाजता होणाऱ्या ‘टॉप स्कॉलर्स’ कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार असल्याची माहिती खेड तालुका युवासेना अधिकारी अजिंक्य मोरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
योगीता दंत महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या टॉप स्कॉलर या कार्यक्रमानंतर येथील पाटीदार भवन येथे ते युवासैनिकांना संबोधित करणार आहेत. युवासेना कोअर कमिटीचे राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम, सिद्धेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दौऱयाचे नियोजन करण्यात आले आहे.
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तालुका युवासेनेच्या पदाधिकाऱयांची नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीमध्ये कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे. महाडनाका येथील गोळीबार मैदानात त्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांच्यासमवेत संपूर्ण बाजारपेठेतून दुचाकी रॅली काढण्यात येणार असल्याचे युवासेना अधिकारी अजिंक्य मोरे यांनी सांगितले.
إرسال تعليق