सांगली:शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या समर्थनात सांगतील आज रॅली काढण्यात आली. भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेशी भिडे गुरुजींचा काहीही संबंध नाही. भिडे गुरुजींवर दाखल झालेला गुन्हा मागे घ्यावा. तसंच महाराष्ट्र बंदमध्ये तोडफोड करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करावी, अशा मागण्या या रॅलीतून करण्यात आल्या.
भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे (गुरुजी) आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.
भीमा कोरेगावमधील हिंसाचाराच्या घटनेमागे संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. संभाजी भिडे यांच्यासह हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याची मागणीही आंबेडकर यांनी केली आहे. तसंच आंबेडकरांनी पुकारलेला महाराष्ट्र बंद यशस्वी ठरल्याने भिडेंविरोधात कारवाई करण्यासाठी दबाव वाढला आहे.
إرسال تعليق