शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची रविवारी रात्री हत्या करण्यात आली. या घटनेने महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. सावंत यांना गेल्या काही दिवसापासून खंडणीसाठी धमक्या येत असल्याचं कळतंय. या खंडणीसाठीच त्यांची हत्या झाल्याचं सांगितलं जात आहे. दहशतवाद विरोधी पथकातील एसीपी सुभाष सावंत हे त्यांचे भाऊ आहे.
अशोक सावंत रात्री घरी परतत असताना त्यांच्या समता नगर इथल्या इमारतीबाहेर दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. सावंत यांना रूग्णालयामध्ये नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सीसीटीव्हीमध्ये सावंत यांचे मारेकरी कैद झाले असून यातील एका आरोपीची ओळख पटली आहे. जग्गा असं या आरोपीचं नाव असून तो कुख्यात गुंड असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सावंत यांना खंडणीसाठी धमकावण्यात येत होतं, त्यांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दाखलही केली होती. सावंत हे दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
إرسال تعليق