सुरत :- जैन मुनी आचार्य शांतीसागरला बलात्काराच्या आरोपाखालीे अटक करण्यात आलीय. एका 19 वर्षीय तरुणीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केलाय.
पीडित तरुणी मूळची मध्यप्रदेशची असून ती सध्या गुजरातमधील बडोद्यात वास्तव्यास आहे. 1 आॅक्टोबरला मंत्रजप करण्यासाठी ती सुरतला जैन मुनीकडे गेली होती. तेव्हाच जैन मुनींनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तीने केलाय.
वैद्यकीय तपासणीत तरुणीवर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यानंतर पोलिसांनी शांतीसागरला अटक केली.
إرسال تعليق