उध्दवसाहेबांना पत्र लिहीत आहे ते तुम्ही वाचून शेअर करा ही विनंती।।
सन्माननीय उध्दवसाहेब ,
जय महाराष्ट्र
मी आपला एक सामान्य शिवसैनिक ।।
सावध व्हा ।।
निवडणूका जवळ येत आहेत ,तुम्हाला चुचकारण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. युतीसाठी जाहीररीत्या प्रस्ताव दिला गेला आहे. तुम्ही सहजासहजी प्रतिसाद देणार नाही , याची त्यांना कल्पना आहे , तुम्हाला हिंदूत्वाची आण दिली जाईल , ईमोशनल ब्लॅकमेल केले जाईल मा.बाळासाहेबांचा वास्ता दिला जाईल , अगदी म्हटले तर बेमालूमपणे नकला केल्या जातील , नेते वेगवेगळ्या भूमिकांमधून तुमच्यासमोर अवतरतील तीन साडेतीन वर्षे अवहेलना करणारे हेच नेते तुमच्यासाठी पायघड्या पसरतील . मातोश्रीच्या पायऱ्या चाटतील , पण तुम्ही स्वबळावरच ठाम रहा आपल्या निर्णयापासून तसूभरही विचलित होऊ नका ...........।।
साहेब ,
साडे तीन वर्षापासून विधानसभा निवडणूकिचे दिवस आठवा .तुम्हाला युतीच्या चर्चेत मशगुल ठेवून आपल्या मित्रपक्षाने आतून निवडणूकीची पूर्ण तयारी केली होती , तुम्ही भाबडेपणावर गेलात , 25 वर्षाची युती तुटणार नाही ,अखेरच्या क्षणी मार्ग निघेल , असा तुम्हाला विश्वास होता , पण साहेब दगाफटका झाला तुमचा विश्वास त्यांनी पायदळी तुडवून त्यांनी स्वबळावर निवडणूका लढविल्या जिंकण्यासाठी साम ,दंड , भेद सर्व तत्वे वापरली . मोठ्या साहेबांची करंगळी धरून महाराष्ट्रात राजकारण करणारा , त्यांच्या नजरेने उठबस करणारा आपला मित्रपक्ष त्यांच्या पशचात मात्र कसा शिरजोर झाला , त्याने आपल्या शी कसे दोन हात केले याचा अनुभव आपण गेल्या निवडणुकीत आपण घेतला आहेच ...
त्यामुळेच पुन्हा अपेक्षा भंगाने मन पोळून घेऊ नका , प्रतारणेच्या वेदना तुम्ही अनुभवल्या आहेतच त्या साहेब वेदना आता पुन्हा नकोत ...........।।।
साहेब सत्तेत राहून साडेतीन वर्षे झालेला अपमान शिवसैनिकांनी विषाच्या घोटाप्रमाणे पिला आहे , तुम्ही जानेवारी महिन्यात कार्यकारीणीच्या बैठकीत स्वबळाची घोषणा केलीत अन् शिवसैनिकांच्या मनावरील औदासिन्याचे मळभ दूर झाले . आमच्या त नवा उत्साह संचारला ..
शिवसैनिकांच्या धमन्यांमधये विचारांच्या ठिणग्या बाळासाहेबांनी पेरलेल्या आहेत ,त्यावर फक्त फुंकर घालण्याची आवश्यकता आहे त्याचे ज्वालांमधये रुपांतर व्हायला वेळ लागत नाही याचा अनुभव या देशाने अनेकदा घेतलेला आहेच ..
शिवसैनिक च शिवसेनेचे खरे वैभव आहेत , तिच संपत्ती आहे , तेच शस्त्र आणि असत्र आहेत ।।
ज्य प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या विश्वासावर मोघल, निजामशाही , आदिलशाही आणि कुतुबशाही सारख्या बलाढ्य साम्राज्यात स्वताचे अस्तित्व उभे केले होते , स्वराज्य निर्माण केले होते ....
शिवसैनिकांच्या रुपाने तिच ताकद आपल्या कडे आहे आपण स्वबळावरच आपले कतृत्व उभारावे व सुराज्य आणावे ।।
शिवसैनिक जिवाचे रान करतील पण साहेब आपण आपला निर्णय बदलू नका ।।
एक आपलाच कट्टर शिवसैनिक
प्रविण तावरे
إرسال تعليق