कर्नाटक:-शिवसेनेने गोवा, उत्तर प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकी लढवल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सीमा ओलांडत दुसऱ्या राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेना आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
शिवसेना महाराष्ट्र एकीकरण समितीला आपण पाठिंबा देणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.आता कर्नाटकात "जय कर्नाटका" नारा घुमवणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले तसेच कर्नाटक राज्यात सुद्धा शिवसेना ५० ते ५५ ऐवढ्या जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे राऊत यांनी म्हणटले. तसेच शिवसेनेने गुजरात विधानसभा निवडणुकी सर्व जागा लढवल्या होत्या व भविष्यात लढवेल.
إرسال تعليق