बाळासाहेब वज्रा हुन कठोर अन मेणाहून मऊ असे व्यक्तिमत्वाचे होते, कधी कधी मित्रासाठी लवचिक व भोळेपणा दाखवणारे होते. पण उद्धव जी हे एक वेगळेच रसायन आहे.....संयमी, शांत पण वेळ येताच जिद्दीने विरोधकांना नामोहरण करणारे आहेत.
ते प्रत्येक वेळी बोलत नाही पण वेळ येताच विरोधकांना तोंडात बोटे घालायला लावतात.
बाळासाहेब विरोधकांना जास्त मनावर घेत नव्हते, ते अपार कष्ठ घेऊन तरुणांना देव, देश धर्म आणि राष्ट्रवाद जपण्याचे आवाहन करीत.
पण उद्धवजी विरोधकांना हिशेबात धरतात आणि वेळ येताच त्यांचा हिशोब चुकता करतात. बाळा साहेबा नंतर आता शिवसेना संपणार असे सर्व पक्षिय लोक समजायला लागले होते पण तसे घडले नाही.निष्ठावंत शिवसैनिक व विश्वासू नेत्यांच्या जीवावर उद्धव जी नी विरोधकांचा तो समज खोटा करून दाखविला त्या साठी साहेबा प्रमाणे अपार कष्ठ करून निखार्यावर चालून विरोधकांना चारिमुंडया चित केले.2014 ची विधानसभा निवडणूक आठवा.....भाजप ची पंतप्रधानां सह दिल्लीची सरकारी केंद्रीय लवाजमा असलेली फौज आणि भाजप सत्ता असलेल्या राज्यातील प्रांतीय फौज महाराष्ट्र वर चालून आली असताना शिवसेने तर्फे उद्धव ठाकरे हे एकमेव स्टार प्रचारक त्यांच्याशी निकराने लढले. त्यांना निष्ठवंत शिवसैनिक व निष्ठावंत "सामना" मोलाची साथ दिली आणि बाळासाहेबांच्या गैर हजेरीत त्यांनी शिवसेनेचे ६३ शिलेदार महाराष्ट्राच्या विधान सभेत पाठविले. त्या मुळे भाजप चे शतप्रतिशत सत्तेचे स्वप्न पूर्ण पणे उध्वस्त झाले. म्हणून कधी कधी विरोधक उद्धवजी ना चिडून उध्वस्त ठाकरे असे म्हणतात.त्या मुळे वाघाचा छावा काही कमी नसतो हे ध्यानात ठेवा.
शिवसैनिक
जयवंत चौधरी
शिवसेना युवासेना परिवार
उदली तालुका रावेर
रावेर लोकसभा क्षेत्र
जि. जळगाव
भ्रमणध्वनी:- 9763426051
إرسال تعليق