संभाजीनगर : शिवसैनिक मोठा झालेला पाहून मी सुद्धा आनंदी होतो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे हेच स्वप्न होते, प्रत्येक शिवसैनिक मोठा झालाच पाहिजे,अस संभाजीनगर दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. आमदार संजय शिरसाट यांच्या कार्यालयाच उद्घाटन देखील त्यांनी आज केलं.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.संभाजीनगर मराठवाडा विभागीय पातळीवरील शिवसेना पक्षाची बैठक त्यांनी आज घेतली. जिल्हावार पक्षाची परिस्थिती, वाद विवाद कार्यकर्त्यांकडून ते समजून तसेच त्याच्या समस्यांचे निवारण देखील त्यांच्याकडून करण्यात आले. बैठकीसाठी मराठवाड्यातील पदाधिकारी आमदार खासदार तथा नगरसेवक बोलावण्यात होते. बैठकीमध्येच येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच आढावा घेतला गेला आहे.
إرسال تعليق