मुंबई(शिवसेना भवन,दादर):- प्लास्टिक बंदीचा निर्णय सर्वसामान्य जनता तसेच सरकारनेही अजून गांभिर्याने घेतलेला दिसत नसला तरी पण युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मात्र प्लास्टिक बंदीसाठी खूपच कष्ट घेत असल्याचे दिसत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारचे पर्यावरण खाते शिवसेनेकडे आहे.मा.श्री रामदासभाई कदम हे पर्यावरण खात्याचे मंत्री आहेत त्यामूळे त्या अनुषंगाने आदित्य ठाकरे यांनीच प्लास्टिकवर बंदी करण्यात यावी यासाठी रामदास कदम यांना सुचना केली होती.युवासेना प्रमुखांच्या या आदेशामुळेच महाराष्ट्र राज्यात "प्लास्टिक बंदीचा" निर्णय घेण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीत शिवसेना भवनमधील कर्मचा-यांनी नेहमीच्या पद्धतीने पाण्याच्या बाटल्या दिल्या होत्या या बाटल्या पाहताच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी कर्मचारी व शिवसेना भवनची व्यवस्था पाहणा-या पदाधिका-यांना या प्लास्टीकच्या बाटल्या बंद करण्याचा आदेश दिला. महाराष्ट्र राज्यात सर्व ठिकाणी प्लास्टिक बंदी झालेली आहे त्यामुळे यापुढे शिवसेना भवनमध्ये प्लास्टिक बाटल्या दिसता कामा नये, अशी ताकीदच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिली.त्यामुळे या पुढे शिवसेना भवनमध्ये पाण्याच्या नुसत्या बाटल्याच नाही तर प्लास्टिकच्या पिशव्या सुद्धा दिसायच्या बंद झाल्याच सांगण्यात येत आहे.
प्लास्टिक बंदीच्या या निर्णयामुळे नक्कीच पर्यावरणात बदल घडू शकेल असे आदित्य ठाकरे यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे या युवा नेत्याच्या कठोर निर्णयाला सर्व स्तरावरून दाद मिळत आहे.
त्यामुळे या युवा नेत्याच्या कठोर निर्णयाला सर्व स्तरावरून दाद मिळत आहे.
إرسال تعليق