शिवसैनिक वार्ता : मुंबई महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे शिवसैनिक तथा नगरसेवक हाजी मोहम्मद हालीम खान हे बिनविरोध निवडून आले आहेत. महापालिकेच्या बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे नगरसेवक हाजी मोहम्मद हालीम खान हे बिनविरोध निवडून आले. विशेष समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. हाजी हालीम खान हे बेहरामपाडय़ातील प्रभाग क्रमांक ९६ चे नगरसेवक आहेत. काँग्रेस, सपा, एमआयएमला हरवून खान हे गेल्या महापालिका निवडणुकीत जिंकून आले होते.
विशेष समित्यांच्या निवडणुका आज पार पडल्या. पालिकेच्या बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हाजी मोहम्मद हालीम खान तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार उमेश माने यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची अनुक्रमे अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
विधी समितीच्या अध्यक्षपदी सुवर्णा करंजे
विधी समितीच्या अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा करंजे तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार चंद्रावती मोरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदी स्मिता गावकर
महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवार स्मिता गावकर तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऊर्मिला पांचाळ यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या तीनही निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर हेमांगी वरळीकर होत्या
ष समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिले होते त्यात हाजी हालीम खान हे बेहरामपाडय़ातील प्रभाग क्रमांक ९६ चे नगरसेवक आहेत. काँग्रेस, सपा, एमआयएमला बाहेरचा मार्ग दाखवत खान हे गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये जिंकून आले होते.
विशेष समित्यांच्या निवडणुका आज पार पडल्या आहेत. महापालिकेच्या बाजार व उद्यान समिती अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेेकडूनचे उमेदवार हाजी मोहम्मद हालीम खान तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार उमेश माने यांचेच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
विधी समितीच्या अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा करंजे तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार चंद्रावती मोरे यांचेच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदी स्मिता गावकर यांची निवड.
महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवार स्मिता गावकर तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऊर्मिला पांचाळ यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या तीनही निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर हेमांगी वरळीकर होत्या.
निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन व तसेच तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
إرسال تعليق