दिन दलितांचे कैवारी..ज्यांनी शेकडो वर्ष गुलामगिरी करणार्या समाजाला ताट मानेने जगायला शिकविले..चिखलात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले..शिका..संघटीत व्हा..संघर्ष करा..असा मुलमंत्र देणारे..देशाचे संविधान निर्माते...मानवतावादी..विज्ञानवादी
हिंदूस्तानचे बहूआयामी...भारतरत्न..विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
.................................................
डॉ.बाबासाहेबांचा विरोध हिंदू धर्माला नव्हता तर हिंदू धर्मातील पृश्य अस्पृष्य जातीव्यवस्थेला होता.आपल्याच धर्मात आपल्या लोकांना मान दिला जात नाही या गोष्टीची भयंकर चीड डॉ.बाबासाहेबांना होती म्हणून दिवसरात्र अभ्यास करून समाजातील रूढी परंपरा खत्म करण्याच्या इराद्याने बाबासाहेब लढत राहिले आणि शेवटी त्यांनी त्यांचे स्वप्न पुर्ण केले...अमेरीकेत जसा वर्णभेद देशाला कलंक आहे तसा हिंदूस्तानात जातीव्यवस्था देशाला खिळखिळी करून टाकीत आहे.याच जातीव्यवस्थेची प्रथा नष्ट करण्यासाठी संविधानात डॉ.बाबासाहेबांनी व त्यांच्या सहकार्यांनी अपार कष्ट केले...परंतू बाबासाहेब जाऊन साठ वर्षांनीही आज देशात जातीपातीत संघर्ष होत आहे..जर आज डॉ.बाबासाहेब असले असते तर त्यांना अपार दुख: झाले असते.
.................................................
स्त्रीला तीचा न्यायहक्क मिळाला पाहिजे...स्त्रीला समान वागणूक मिळाली पाहिजे या करीता डॉ.बाबासाहेबांनी मोलाची कामगिरी केली होती.देशात शांतता रहावी याकरीता प्रयत्न करणारे..अनेक पदव्या प्राप्त करणारे..हजारो पुस्तकांचे वाचन करून ज्ञानाचा महासागर म्हणून मान मिळविणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या महाराष्ट्रात वाढले हे आपले भाग्यच आहे...त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम.
जय महाराष्ट्र.
अतुल श्रावण भवर,सोलापूर.
मो.नं.9960090001.
إرسال تعليق