औरंगाबाद- दुपारी दोन वाजले असता सूर्यप्रकाशाचे किरण प्रखर असताना अचानक एका अपघात झाला.तो म्हणजे कणड-वैजापूर रस्त्यावर,सारजेगाव येथे. रस्ता ओलांडणारा ट्रॅक्टरकडे ट्रक येऊन धडकला. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाला नाही. पण ट्रॅक्टर आणि ट्रक ड्रायव्हर्सनी चुक नेमकी कोणाची ह्या मुद्द्यावर वाद घालत दोन्ही चालकात चांगलीच जुंपली असता तेवढ्यात कन्नडचे शिवसेना आमदार मा.हर्षवर्धन भोसले यांनी या प्रकारात दखल घेत दोन्ही चालकास शांत केलं.
तसेच प्रकरण मिटवल्या क्षणी ते स्वतः तेथील अन्य माणसे घेऊन ट्रकला धक्का देत तो बाजूला सारवला.
अश्या भयानक वेळी खुद्द आमदार साहेबच मध्यस्थी करत असल्यामुळे दोन्ही चालक शांत झाले.
आधीच वादावाद सुरू असताना रस्त्यावरची वाहतूक खोळंबली होती.त्यामुळे कुणाची वाट न पाहता शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी स्वतः ट्रकला धक्का दिला हे दृश्य पाहून इतरही मदतीला आले आणि दोन्ही वाहन रस्त्याच्या बाजूस करण्यात आली. वाहतूकीची कोंडी सुरळीत झाल्यावरच आमदार हर्षवर्धन जाधव आपल्या पुढील प्रवासासाठी निघून गेले.
Post a Comment