'विकासाचे युवापर्व' प्रथम वर्षपूर्ती कार्य अहवालाचे अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहुर्तावर अनावरण #शिवसेना नेते - युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते...
---
प्रिय बंधु - भगिनींनो,
जय महाराष्ट्र!
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने, माननीय शिवसेना नेते - युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या साथीने, स्थानिक समस्त शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने, निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेहनतीच्या जोरावर व आपल्या अनमोल पाठिंब्याने बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूकीत गतवर्षी माझा विजय झाला. विजयाचा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, हा विजय आपला सर्वांचा आहे.
आपल्या आशिर्वादांमुळे व सुचनांच्या अनुसार प्रभागातील नगरसेवक कक्षेतील सर्वांगीण विकासासाठी, रस्ते - पाणी - शौचालय - स्वच्छता - उद्याने इत्यादी विविध नागरी सुविधांच्या संदर्भात मी सातत्याने कार्य करीत आहे, तसेच महानगरपालिका सभागृहात केवळ हजेरी न लावता परखड मत मांडुन सूचना करून त्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला आहे.
प्रथम वर्षात अनेक विकासकामे सुरू झाली, माहीम येथील एनआयसीयू, कर्नल संतोष महाडीक उद्यान, साईसुंदर नगर येथील पाण्याच्या समस्येचे निराकरण, अनेक शौचालयांची दुरुस्ती, रस्त्यांचे डांबरीकरण, सुशोभीकरण, सोसायट्यांमधील लादीकरण, ड्रेनेज लाईन्सची दुरुस्ती इ. काही उल्लेखनीय कामे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठिंब्याने माझी मुंबई शहर आरोग्य समितीच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली, ज्याअन्वये आरोग्य विभागासाठी काम करण्याची संधी प्राप्त झाली. पालिकेच्या रुग्णालयांना वेळोवेळी वैयक्तिक भेट देऊन तेथील व्यवस्थापन, कर्मचारी व रुग्णांसोबत संवाद साधून मी सभागृहात त्यांच्या मागण्या मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, ज्यांस यश मिळत आहे.
या सर्व कार्यांमागे ज्येष्ठांचे आशीर्वाद, सर्व शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, भारतीय विद्यार्थी सेना, स्थानीय लोकाधिकार समिती, अंगिकृत संघटना, स्थानिक सामाजिक संघटना, प्रभादेवीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, शिवसैनिकांची मोलाची साथ तसेच प्रभागातील नागरिकांचे भरीव सहकार्य मला सदैव लाभले, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे.
निवडणूकीत दिलेली आश्वासने व तुम्हां सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कटीबद्ध आहे. आगामी काळात आपला स्नेह असाच लाभू द्या, जेणेकरुन प्रभागाच्या
उन्नतीसाठी मला अधिक बळ मिळेल. यापुढील प्रभागाच्या प्रगतीपथावर आपण माझ्या पाठीशी नव्हे तर सोबत रहा, ही नम्र प्रार्थना!
आपला कृपाभिलाषी,
समाधान सदा सरवणकर
नगरसेवक
---
संपूर्ण कार्य अहवाल : https://goo.gl/pGtuhn
إرسال تعليق