एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला  ,तिरडी तयार करून लोक ती अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमीकडे जाऊ लागले तोच एक व्यक्ती तिथे आली आणि तिरडी धरणाऱ्या पैकी एकाचा पाय धरून ओरडू लागला की मेलेला मनुष्य माझे 15 लाख रुप्ये देणे आहे , जोपर्यंत माझे क़र्ज़ मला परत नाही मिळत तोपर्यंत अंत्यसंस्कार करू नाही देणार....
जमलेले सर्व लोक चाललेला तमाशा बघु लागले
😲😲
तेवढ्यात मृत व्यक्तीची मूले बोलू लागली की आमच्या वडिलांनी कधी आम्हाला या कर्जाच्या बाबत सांगितले नाही त्यामुळे आम्ही हे कर्ज नाही देणार. 😏
तेव्हा मृत व्यक्तीचे भाऊ बोलले की मुले जबाबदारी नाही घेत तर आम्ही पण देऊ शकत नाही.
आता सगळे उभे राहिले व याने तर प्रेतयात्रा अडवलेली...
जेव्हा खूप वेळ झाली तोपर्यंत ही गोष्ट घरातील बायकांपर्यंत गेली,
☝🏻
ही गोष्ट जेव्हा मृत व्यक्तीच्या एकुलत्या मुलीला कळाली तेव्हा तात्काळ तिने आपले दागिने व घरातील ठेवलेले किमती वस्तू,पैसे इ. त्या माणसाकडे पाठविल्या आणि सांगितले की हे सर्व विकून त्याचे पैसे तुमच्याकडे ठेवा ,,, पण माझ्या वडिलांची प्रेतयात्रा थांबवू नका..
मी सर्व कर्ज फेडून टाकेन आणि बाकी रक्कम लवकरच पाठवून देईन .....
☝🏻
आता तो  माणूस उभा राहिला व सर्व उपस्थित लोकांना बोलू लागला ..की खरे पाहता गोष्ट अशी आहे की मेलेल्या माणसाकडून 15 लाख येणे नाही तर उलट मी त्याला देणे आहे,परंतु मी याच्या वारसदारांना ओळखत नव्हतो म्हणुन मी हा खेळ खेळला...
आता मला कळाले की या मृत व्यक्तीचा वारस फक्त त्याची मुलगी असून इतर कोणी नाही, असे सांगून ती व्यक्ती निघून गेली,
आता मुले व भाऊ मान खाली घालून फक्त हताशपणे उभे होते. .😕

       ब*बोध*
मुलगी असणारे खुप भाग्यवान आहेत कारण मुली आपल्या आईवडिलांनाच आपली दौलत समजतात ,म्हणुनच मुलगी झाली  तर खुश व्हायला हवे ना की दुःखी.
अशी प्रार्थना करा की प्रत्येकाला एक मुलगी मिळावी जी  वडिलांना नेहमी स्मरणात ठेवेल.

Post a Comment

أحدث أقدم