मुंबई: शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पालिका मुख्यालयात शिवसेनेच्या नागसेवकांशी सवांद साधला. प्लॅस्टिकबंदीसाठी नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डात नागरिकांमध्ये जनजागृती करावी असे आवाहन त्यांनी केले.
आदित्य ठाकरे म्हणाले, गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू केली आहे. या निर्णयाचे मुंबईकरांनी स्वागत केले आहे, मात्र या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरसेवकांनी लोकांमध्ये जनजागृती करावी.
नुकत्याच झालेल्या सिनेटच्या निवडणुकीत युवासेनेचे सर्वच्या सर्व उमेदवार जिंकून आणण्यासाठी नगरसेवकांनी घेतलेल्या मेहनतीचेही यावेळी शनिवारी आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले.
إرسال تعليق