शिवसेनेच्या जिवावर मोठे होऊन अनेक बाडग्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली काहींनी इतर पक्षाशी लाचारी केली तर काहींनी स्वत:चे पक्ष काढले.देवतासमान बाळासाहेबांना ज्यांनी ज्यांनी धोका दिला ते सर्वच्या सर्व रसातळाला गेले आहेत.त्या सर्व गद्दार बाडग्यांचे राजकारण संपुन गेलेले आहे..असाच एक फुटलेला गद्दार २६ महिन्यानंतर झेेल मधून बाहेर आला तर लागलीच त्याला वाघाची उपमा दिली जाते हि खूप लाजिरवाणी बाब आहे.
जनतेच्या मतावर निवडून येऊन सत्तेवर बसून..सत्तेचा दुरूपयोग करून...सरकारी तिजोरीतून लाखो रूपये हडप करायचे याला वाघाचे वाघपण म्हणत नाहीत तर याला जनतेची घरे लुटणारा चोर म्हणतात.
................................................
असेच काही चोर शिवसेनेत असताना वाघ होते परंतू शिवसेना सोडल्यानंतर इतर पक्षात जाऊन चोरी करायला शिकले..दरोडा टाकायला शिकले..भ्रष्टाचार करायला शिकले.
असल्या चोरांना सच्चा शिवसैनिक फाट्यावर मारतो.आमच्या दैवताला ज्यांनी अपार दुख: दिलं तो आमचा वैरी आहे आणि मरेपर्यंत आमचा त्याला विरोध असणार..मग तो कोणीही कितीही मोठा असो..आम्हाला काही फरक पडत नाही.आम्ही फक्त इमानाला महत्व देतो बेईमानाला आमच्या जीवनात कवडीचीही किंमत नाही.
.................................................
शिवसेनेत असताना नाव कमवायचे आणि इतर पक्षाची आॅफर आली कि करोडो रूपयाची सेटलमेंट करायची आणि शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायचे धंदे साहेब असल्यापासून होत आहेत परंतू शिवसेनेला याचा काही फरक पडत नाही..शिवसेना हि शिवसैनिकांच्या ताकदीवर लढणारी लढवय्या संघटना आहे इतर पक्षांना जिवंत राहण्यासाठी पैसे फेकावे लागतात.आज शिवसेना सोडून गेलेल्या प्रत्येक नेत्यांकडे अफाट पैसा जरी असला तरी त्यांची महाराष्ट्रात शुन्य किंमत आहे..आज अनेक नेते इ.डि.च्या जाळ्यात अडकलेले आहेत त्या सगळ्यांना झेलमधे टाकले पाहिजे.
जनतेच्या पैशावर स्वत:च घर भरणारी दळभद्री अवलाद शिवरायांच्या महाराष्ट्रात काय कामाची..?? महाराजांनी गवताची काडीसुद्धा गहाण ठेवली नाही आणि आताचे नेते शिवरायांच्या नावाखाली महाराष्ट्र गहाण ठेवतात त्या लोकांची महाराष्ट्रात रहायची लायकी नाही.
.................................................
भ्रष्टाचार करणारा हा खून करणार्या आरोपी इतकाच गुन्हेगार असतो..एखादा खून केला तरी एकट्याचाच जीव जात असतो परंतू हजारो कोटी रूपये गिळून हजारो शेतकर्यांच्या आत्महत्या करणार्या लोकांच्या खूनाचा गुन्हेगार हेच भ्रष्टाचारी नेते असतात असल्या लोकांना हायकोर्ट वा सुप्रीम कोर्ट जामीनच कसे देतो हे न समजण्यासारखे आहे..सध्या कोर्ट वा कायदा हा पैशावर चालत असल्यामुळे गरीबाला या कायद्यासमोर न्याय मिळत नाही न्याय फक्त पैसेवाल्यांचा गुलाम बनला आहे..न्यायव्यवस्थेची ही गुलामगिरी एक दिवस देशाला भिकारी बनविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
...........................................
शिवसैनिकांनो आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत त्यामुळे आपण सत्यवादी आहोत..असत्यापासून जनतेचे रक्षण करणे आपल्याला साहेबांनी शिकविले आहे..कोणत्याही भ्रष्टाचार्याला आपल्या जिवनात स्थान देऊ नका..शिवसेना व्यतिरीक्त कोणाचे समर्थन करणे मला आवडत नाही कारण साहेबांचा मी शिवसैनिक आहे.
..................जय महाराष्ट्र...................
           अतुल श्रावण भवर,सोलापूर.
            मो.नं.9960090001.

http://www.shivsainik.online/

1 تعليقات

  1. जय महाराष्ट्र राजे ।।
    मी माझ्या जीवनात भ्रष्टाचाऱ्याला कधीही थारा देणार नाही ।।

    ردحذف

إرسال تعليق

أحدث أقدم