शिवसेनेचे तरूण तडफदार उमेदवार श्रिनिवास चिंतामण वनगा
 श्रीनिवास हे कला शाखेचे पदवीधर आहेत वडील खासदार आणी आमदार असताना सुद्धा कधी वडीलांच्या नावाचा कधी गैरवापर केला नाही.
ते स्वता शेती मधुन मिर्चीचे पिक घेत होते .स्वता स्वयंपुर्ण होते.
आज कालच्या जमान्यात खासदार आमदारांचे घरची मंडळी कार्यकर्ते सरकारी अधिकार्यांवर रूबाब झाडतात व आपल्या वाट्याला व आपल्या चमच्यांना खोटी बिले काढण्यासाठी व सरकारी मलिदा आपल्या चेल्या चपाट्यांना मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील असतात.
      परंतु या सर्व  गोष्टी पासुन दुर आपला स्वताचा वेगळा मित्रांचा गोतावळा आपल्या सोबत जोडला होता  याच मुळे ते कवाडा ग्रामपंचायतीचे ते दोन वेळा सभासद म्हनुन निवडुन आले.श्रीनिवास यांनी ठरवले असते तर वडीलांच्या नावाचा फायदा घेवुन करोडो रुपयांची माया गोळा करू शकले असते.परंतु त्यांनी आपल्या वडीलांच्या नावाला डाग लागेल असे कोणतेही काम गेल्या ३५ वर्षात केले नाही.
     गेल्या १० वर्षापासुन पक्षाचे पदाधीकारी म्हणुन तालुका स्तरावर काम करत होते.आजच्या राजकारणात एवढा संयमी आणी मितभाषी व्यक्तीमत्व शोधुन सापडणार नाही.अशा ह्या कोहीनुर हीरा भाजपाकडे असुन सुद्धा पक्षाला त्याचे महत्व दिले नाही,त्यांनी दिलेले पक्षाला योगदान ओळखतां आले नाही.आज तोच कोहीनुर हीरा एकनाथ भाई शिंदे साहेबांच्या हातात गेल्यावर त्याला पैलु पाडण्याचे काम त्यांनी केले.
      आज समाजातील सर्व स्थरातुन  श्रिनिवासला भरभक्कम पाठींबा मिळत आहे.प्रत्येक मतदार हाच बोलतोय या वेळेस आम्ही पक्ष बघणार नाही श्रीनिवास चिंतामण वनगा हे नाव बघणार आणी मतदान करणार.वनगा साहेबांचे एकेकाळचे कट्टर विरोधक लालबावट्याचे पण बरेच काॅम्रेड सुद्धा हेच बोलत आहेत.
   आज खऱ्या अर्थानेच वनगा साहेबांचे कार्य,त्यांच्या मृत्युनंतर किती महान व महत्वपूर्ण होते याची प्रचिती येते.आज आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे.नुसत वाचून गप्प बसायचे नाही तर आपल्या आजूबाजूला असलेल्या नातेवाईक मित्रमंडळींना सांगायचंय *कोंबडी, दारूच आमिष दाखविले जाईल पण,आपण आठवण ठेवायची आणी करून द्यायची साहेबांची.
श्रिनीवास खासदार होणे हीच दादांना खरी श्रद्धांजली.



2 تعليقات

إرسال تعليق

أحدث أقدم