संभाजीनगर : हिंदू शक्ती मोर्चासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक पैठणगेट परिसरात जमा झाले असून पोलिसांकडून चिली ड्रोन द्वारे नजर ठेवण्यात येत आहे तासाभरात मोर्चा निघण्याची तयारी होईल मात्र पोलिसांनी हा मोर्चा पैठणगेटलाच अडवण्याची तयारी ठेवली आहे.
शहरात झालेल्या दंगलीला कारणीभूत धर्मांधांना अटक करून हिंदू समुदायाला संरक्षणाची हमी देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने हिंदू शक्ती मोर्चाचे आज आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त पैठणगेट परीसरात तैनात आहे. पोलीस आयुक्तांसह तिन्ही उपायुक्त, वरुण, वज्र, दंगा काबू पथकांचे पाचारण करण्यात आले असून मोर्चेकरी घोषणाबाजी करत आहे. पोलिसांनी हा मोर्चा पुढे जाऊ नये यासाठी तय्यारी केली असून शिवसेनेच्या वतीने सहभागी लोकांना ना घाबरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मोबाईल सेवा बंद करण्यात आल्या होत्या.
दहा वाजेच्या सुमारास मोबाईल सेवा ठप्प झाली होती अकराच्या सुमारास ही सेवा पूर्ववत झाली. त्यामुळे पोलीस पूर्ण तयारीत असल्याचा संदेश पोलिसांनाही काही न बोलता पोहचवला आहे. या मोर्चाला महिलांची मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. तर टिळक पथावर मोर्चा अडवण्यासाठी दुसरी तयारी करण्यात आली आहे.
إرسال تعليق