पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असताना, पालघरमध्ये पैसे वाटप करण्याचा प्रकार समोर आला आहे. पालघरमध्ये दिवसाढवळ्या पैसे वाटप केले जात आहेत, असा आरोप शिवसेनेने भाजपवर केला आहे. पैस वाटप करताना शिवसैनिकांनी काही लोकांना रंगे हात पकडले आहे. शिवसैनिकांनी पालघरच्या डहाणू येथील रानशेत भागात पैसे वाटप सुरू असताना, अचानक जाऊन हा डाव उधळला. यावेळी पोलिसांना देखील बोलवण्यात आलं, जो इसम पैसे वाटप करत होता, त्याने दिलेल्या कबुली दिल्या असल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे. भाजप पालघर शहराध्यक्षांनी पैसै देऊन, पाठवलं असल्याची पैसे या इसमाची कबुली दिली आहे.शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार अमित घौडा यांनी रानशेत भागात जाऊन यांना पकडलं आहे.
إرسال تعليق