पालघर :काल पालघर सभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची अंडीपिल्ली बाहेर काढल्यावर घाईत केशवकुंज मधे एक मीटिंग घेण्यात आली . त्या मीटिंग मधे असे ठरले की क्लिप खोटी आहे यातला आवाज मुख्यमंत्र्यांचा नाही अस ठरवण्यात आल .
त्या प्रमाणे भाजप मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आणि केशव उपाध्ये यानी ही क्लिप बनावट असल्याची बाईटही दिली पण अचानक रात्री 9 वाजता पालघर प्रचाराची जबाबदारी असलेल्या गिरीष महाजन यांनी या क्लिप मधला आवाज मुख्यमंत्र्याचा असल्याचे कबूल केले (यात भाजप मधले अंतर्गत राजकारण आहे असे सांगीतले जाते ).
गिरीष महाजन यांच्या कबुलीजबाबा नंतर भाजप मधे भूकंप झाला तातडिची बैठक वर्षा या निवासस्थानी घेण्यात आली . पालघर सिट आधीच तिसर्या क्रमांकावर आहे आता अजुन बदनामी नको म्हणून जी क्लिप आलिय त्यात मागे पुढे ओळी जोडून ती जाहिर करण्याची रणनीती ठरवण्यात आल्याचे भाजपचे सूत्र सांगतात .
आज सकाळी मुख्यमंत्र्याची कुठलीही पूर्वनियोजित सभा नसताना केवळ गेलेली अब्रू परत सावरायला एक सभा घेउन काल रात्री वर्षा बंगल्यावर पुनमुद्रित ध्वनिफीत वाजवण्यात आली.
आजच्या सभेला प्रचार प्रमुख असणार्या गिरिष महाजन यांची अनुपस्थिति आणि हायटेक भाजपचा लंगडा खुलसा यायला लागलेला वेळ या गोष्टी बरच काही सांगुन जातात अशी चर्चा सर्वत्र आहे .
إرسال تعليق