येथील नगरपंचायतच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या प्रतिभा बोडखे यांची निवड झाली आहे. पैशांची मस्ती चढलेल्या भाजपने भरसभागृहात ५ लाख रुपये देऊन नगरसेवकाला खरेदी करण्याचा रचलेला डाव शिवसेनेच्या नगरसेवकांनी उधळून लावत भाजपच्या श्रेष्ठींना चांगलाच चकवा दिला आहे. विशेष म्हणजे भाजपाचे प्रदेशाद्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपचा नगराध्यक्ष व्हावा, यासाठी सर्वतोपरी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले.
सोयगाव नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी आज शनिवारी विशेष सभा बोलावण्यात आली होती. शिवसेनेने प्रतिभा बोडखे यांना उमेदवारी दिली होती. या ठिकाणी युती असताना भाजपने ऐनवेळी उमेदवार उभा करून गद्दारी केली. कुठल्याही परिस्थितीत भाजपाचा नगराध्यक्ष झाला पाहिजे, यासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विशेष लक्ष घातले. विशेष म्हणजे सोयगाव हे दानवे यांच्या लोकसभा मतदारसंघातील गाव आहे. आज विशेष सभेच्या वेळी शिवसेना नगरसेवकांची मते आपल्याला पाडून घेण्यासाठी भरसभेमध्ये शिवसेनेचे नगरसेवक भगवान इंगळे यांना ५ लाख रुपये देण्याचा प्रयत्न झाला. परंतु इंगळे व माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक असलेले योगेश पाटील यांनी हे पैसे खिडकीतून फेकून दिले. यामुळे भाजपचा डाव उधळला गेला.
पैशांची मस्ती उतरली!
भाजपला पैशांची खूपच मस्ती चढलेली असून, आजपर्यंत अनेक निवडणुकीत ते दिसून आलेले आहे. आजच्या निवडणुकीत त्यांनी पैसे देण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवसेना नगरसेवकांनी पैसे बाहेर फेकून त्यांची मस्ती उतरवली असून, नगराध्यक्षपद मिळविण्याचे मनसुबे उधळून लावत त्यांना चकवा दिला असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी म्हणाले. शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वच पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्यामुळे शिवसेनेचा नगराध्यक्ष होऊ शकला, असेही त्रिवेदी म्हणाले.

إرسال تعليق