मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र स्थळ असलेल्या मक्का-मदिना येथे एका शिवसैनिकाने शिवसेनेचा महाराष्ट्रावर भगवा फडकू दे, शिवसेनेला एकहाती सत्ता मिळू दे यासाठी प्रार्थना केली आहे.
बीड जिल्ह्यातील सिरसाला येथील शिवसैनिक शेख नशीब मक्का मदिना या पवित्र स्थळी गेले आहेत. तिथे त्यांनी काबाचे तवाफ करून शिवसेनेला बळ द्या अशी दुवा मागितली.
खांद्यावर भगवं उपरणं घेऊन आणि हातात शिवबंधन बांधलेला हा शिवसैनिक प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होता. शेख नशीब यांनी शिवसेनेचा महाराष्ट्रातील झंझावात असाच कायम राहू द्या . महाराष्ट्र वर शिवसेनेची एक हाती सत्ता मिळू द्या अशी प्रार्थना केली आहे. खांद्यावर भगवा घेऊन मक्केत दाखल झालेला मुस्लिम शिवसैनिक.
Jay Maharashtra Bhai jaan
ردحذفإرسال تعليق