मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन भावांनी मतभेद बाजुला ठेऊन मराठी माणसांसाठी एकत्र यावं यासाठी एक कार्यकर्ता चक्क दादरच्या उड्डाणपुलावर चढलाय. हा कार्यकर्ता शिवसैनिक असून त्याचं नाव शाम गायकवाड असं आहे.
शाम गायकवाड आज दुपारच्या सुमारास दादरमधील खोदादाद सर्कल येथील जगन्नाथ शंकरसेठ उड्डाणपुलावर चढला. अचानक उड्डाणपुलावर कोणीतरी चढलंय हे पाहून या ठिकाणी अनेक बघ्यांची गर्दी झाली. सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू असून शाम उड्डाणपुलाच्या मनोऱ्यावर चढला व तेथून त्यानं आंदोलन सुरू केले. राज आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाच्या भल्यासाठी एकत्र यावं अशी त्याची मागणी आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून शामला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
إرسال تعليق