मुंबई | पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे पुढील रणनीती ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली.
पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी उमेदवारी निश्चितीवरुन बरीच खलबतं झाल्याचं कळतंय.
दरम्यान, वनगांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेबांकडे वनगा कुटुंबाने वेळ मागूनही त्यांनी वेळ न दिल्याची खंत व्यक्त केली. याचाच फायदा शिवसेनेने घेऊन श्रीनिवास यांना उमेदवारी दिली.
إرسال تعليق