अहमदनगर: माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असे अजब विधान श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले. रविवारी संभाजी भिडे यांची नाशिक येथे सभा झाली. यावेळी भिडे यांनी म्हटले की, माझ्या शेतातील आंबा खाल्लास अपत्यप्राप्ती होते. आतापर्यंत १८०हून अधिक जोडप्यांना मी हा आंबा दिला. त्यातील दीडशे जणांना अपत्यप्राप्ती झाली असल्याचा दावा भिडे यांनी केला. आपल्या शेतातील आंब्यामुळे अपत्यप्राप्ती होते ही बाब फक्त आईलाच सांगितली होती. आता तुम्हाला सांगत असल्याचे भिडे यांनी सभेत म्हटले.

भिडे गुरुजींचा ह्या विधानाचा असा होतो अर्थ.

माझ्या शेतातला आंबा म्हणजे शिवशंभू रक्तगटातला आंबा अन माझ्या ह्या शेतातला आंबा खाल्ला तर तुम्हाला शिवशंभू रक्तगटाचा मुलगा होईल ह्याची मी खात्री देतो हे गुरुजींच्या वक्तव्यामागचे अर्थ, उगाच ह्या भांड मीडिया च्या नादाला लागू नका, फक्त कट पेस्ट दाखवतात ते TRP साठी !!!

गुरुजींचं शेत म्हणजे सर्व हिंदू समाज, ह्या व्याख्यान च्या शेवटी ते व्यसन मुक्तीची शपथ समस्त तरुणांकडून घेतली आहे हे विसरू नका, त्यातले निम्मे अधिक तरी व्यसन मुक्त होतील ह्याची खात्री आहेच, उगा सूर्यावर थुंकायचा प्रयत्न करू नका !!

भविष्यात तलवारी हाथी घ्यावेच लागतील - संभाजी भिडे गुरुजी

तत्पूर्वी रायगड येथे ३२ मण सुवर्णसिंहासनाची पुनर्स्थापना आणि खडा पहारा तुकडी निर्मितीच्या प्रचार-प्रसारासाठी नाशिकमध्ये रविवारी भिडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेतही भिडे यांची काही विधाने लक्ष वेधून घेणारी ठरली होती. रायगडावरील सिंहासनाच्या रक्षणासाठी खरे तर या धारकऱ्यांच्या हाती तलवारी असायला पाहिजे होत्या. मात्र, त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हे काय चालू आहे, म्हणून टीका करतील. त्यामुळे तुर्तास याठिकाणी धारकरी काठ्याच घेऊन जातील. परंतु, भविष्यात त्यांच्यावर तलवारी हातात घेऊन जाण्याची वेळ नक्कीच येणार आहे, असे संभाजी भिडे यांनी सांगितले. 

Post a Comment

أحدث أقدم