नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाच्या (21 जून) दिवशी वेगवेगळ्या प्रकारची योगासने करतानाचे फोटोशूट केले होते. ते सोशल मिडियावर व्हायरल झाले. परंतु, आता या फोटोशूटसाठी नरेंद्र मोदी यांनी 35 लाख रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे. 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मिडियावर फिटनेस चॅलेंज दिले होते. मोदींनी ते स्वीकारून याचे उत्तर सोशल मिडियावर देताना आपण हे चॅलेंज स्वीकारल्याचे सांगितले होते. मोदींने विराटचे चॅलेंज पूर्ण केले खरे. परंतु, त्याचे फोटोशूट करण्यासाठी तब्बल 35 लाख रुपये खर्च केले आहेत. पंतप्रधान मोदींचे योगासने करतानाचे ज्या कंपनीने शूट केले आहे, त्यांचे मानधन म्हणून त्यांना ही रक्कम देण्यात आली आहे, अशी माहिती शूट करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

2015 सालीही सरकारने योग दिनासाठी तब्बल 15 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती उघड झाली आहे. ही माहिती, महिती अधिकाराखाली देण्यात आलेल्या याचिकेतून उघड झाली आहे. त्याचबरोबर, आयुष मंत्रालयाच्या माहितीनुसार यावर्षी योग दिनावर सरकारने तब्बल 20 कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती दिली आहे. ज्यामध्ये योग दिनाचे टी-शर्ट आणि योग दिनादिवशी देण्यात आलेल्या चटायांच्या खर्चाचा समावेश आहे.


Post a Comment

أحدث أقدم