मुंबई : कंत्राटदारांच्या कामगारांकडून केली जाणारी जुहू चौपाटीची स्वच्छता आता बीच क्लिनिंग मशिनद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच तीन अत्याधुनिक मशिन आयात करण्यात येणार आहेत. स्थानिक रहिवाशांच्या सूचना लक्षात घेऊन मशिन खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून पावसाळ्यातील सफाईच्या दृष्टीने चार महिने व उर्वरित आठ महिने असे मशिनने स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले आहे.

समुद्राला भरती असताना लाटांबरोबर वाहून येणाऱ्या कचऱ्याची आणि जुहू चौपाटीवरील इतर कचऱ्याची पालिकेकडून नियमित साफसफाई केली जाते. जुहू चौपाटीची लांबी सुमारे सहा किलोमीटर असून रुंदी ६० मीटर आहे. चौपाटीवर पावसाळ्याच्या काळात दररोज १२५ मेट्रीक टन, तर पावसाळ्याव्यतिरिक्त आठ महिन्यात दररोज सुमारे २० मेट्रीक टन कचरा गोळा होतो. या स्वच्छतेसाठी पावसाळ्यात रोज १२० कामगार तर उर्वरित काळात ६० कामगार लागतात. कामगारांसोबतच आता मशिनचाही स्वच्छतेसाठी वापर केला जाणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم