‘माझ्या मृत्यूचे उद्धव ठाकरेंना कळवा,’ असे पत्र लिहून शेतकऱ्याने केली आत्महत्या
त्यांच्या मागे पत्नी, २ मुली आणि १ मुलगा असा परिवार आहे.
अमरावती, ०६ ऑक्टोबर २०१८- अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तुरखेड येथील शेतकरी शंकरराव चोपडे,(वय ५१) यांनी सततच्या नापिकी व त्यामुळे झालेल्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणा, 3 वर्षांपासूनची नापिक जमीन यामुळे आपण हरलो असून, परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख चोपडे यांनी केला.
तसेच आपल्या आत्महत्येची बातमी त्यांचे खास हितचिंतक शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवावे असा उल्लेख चोपडे यांनी आपल्या चिट्ठीत केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे चिठ्ठीत चोपडे यांनी आपल्या व्यथा मांडत, त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष देण्याची आर्त विनवणी पत्रात केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना नेते तथा अमरावती लोकसभा मतदार संघाचे खासदार आनंदराव अडसूळ, जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, उपजिल्हाप्रमुख विकास येवले, तालुकाप्रमुख कपिल देशमुख आदींनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले व कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांच्या मागे पत्नी, २ मुली आणि १ मुलगा असा परिवार आहे.
إرسال تعليق