कर्जत :- पुढील वर्षी होणाऱ्या कर्जत नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. कर्जत शहरातील दहिवली येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ल्याला शिवसेनेने जोरदार सुरुंग लावला असून असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिले.
कर्जत नगरपालिका हद्दीतील आकुर्ले, बामचा मळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षाची बैठक पोसरी येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांच्या कार्यालयात आयोजित केली होती. त्यावेळी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे यांच्या उपस्थितीत त्या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे, कर्जत विधानसभा मतदारसंघाचे संघटक संतोष भोईर, तालुका प्रमुख संभाजी जगताप, महिला जिल्हा संघटक रेखा ठाकरे,युवासेना जिल्हा अधिकारी मयूर जोशी,माजी उपजिल्हा प्रमुख भाई गायकर,शिवसेना तालुका संघटक राजेश जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच पोलीस मित्र संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह बामचा मळा आणि आकुर्ले येथील 300 हुन अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला,त्यात महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे यांनी त्यांचे शिवबंधन बांधून स्वागत केले. यावेळी बामचा मळा येथील शिवसेना शाखेची स्थापना आणि नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात राजू ऐनकर यांची शाखाप्रमुख म्हणून तर रुपेश ऐनकर यांवही उपशाखा प्रमुख तर सचिव म्हणून सतीश देशमुख, म्हणून नेमणूक करण्यात आली.
إرسال تعليق