मुंबई: घरपोच दारु नको, दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केला. महाराष्ट्र सरकार ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी देऊन, दारुच्या होम डिलिव्हरीला ग्रीन सिग्नल देणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रक प्रसिद्ध करुन सरकारवर हल्ला चढवला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “घरपोच ऑनलाईन दारु पोहोचवण्याचा प्रकार हास्यास्पद आणि धक्कादायक आहे. घरपोच दारुच्या बाटल्या पोहोचवण्यापेक्षा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना तातडीने घरपोच मदत पोहोचवा”. इतकंच नाही तर, ऑनलाईन दारु देणे हे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. पण राज्याची ‘शोभा’ करण्याचे प्रकार रोजच सुरु असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
पण मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे घरपोच दारू विक्रीचा कुठलाही निर्णय सरकार घेणार नसल्याचे सांगितले आहे.
إرسال تعليق