मुंबई
कोकणातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा अभ्यासक्रम अहमदाबादला हलवण्याचा डाव युवासेना उधळून लावणार असा इशारा मंगळवारी युवासेनेकडूने मुंबई विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आला. यागोष्टीवर युवासेना सिनेट सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरून हा अभ्यासक्रम तीन वर्षे का लांबणीवर टाकला असा याबाबत जाबही विचारला.
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात रेल्वे इंजिनीयर घडलेला व कोकणच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरणार असलेला ‘सिंधु स्वाध्याय’ असे दोन महत्त्वाचे अभ्यासक्रम प्रशासनाच्या ना कर्तेमुळे धूळखात पडले गेले होते."रेल्वे अभ्यासक्रम" अहमदाबादला हलवण्याच्या म्हणजेच नेण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळली असताच युवासेना सिनेट सदस्यांच्या शिष्टमंडळाने विद्यापीठावर सरळ धडक देत प्रशासनाला धारेवर धरले.कोकणातील विद्यार्थ्यांच्या करीअरसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा हा कोर्स रत्नागिरी येथेच सुरू झाला पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी हा अभ्यासक्रम यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करावा अशा मागणीचे निवेदनही प्रभारी कुलसचिव दिनेशजी कांबळे सरांना देण्यात आले. यावेळी युवानेसेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, महादेव जगताप, शशिकांत झोरे, राजन कोळंबेकर, धनराज कोहचाडे उपस्थित होते.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा
तीन वर्षीय पदवी रेल्वे अभ्यासक्रमामुळे रेल्वे सेवेत आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ मुंबई विद्यापीठात तयार होणार आहे. तर ‘सिंधु स्वाध्याय’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र विद्यापीठ प्रशासनाच्या ना कर्त्यामुळेच हे अभ्यासक्रम रखडले आहेत. त्यामुळे या रखडपट्टीला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणीही युवासैनिकांनी केलीली आहे.
पीएचडीची दुप्पट फीवाढ मागे घ्या
मुंबई विद्यापीठाने पीएचडी सिनॉपसेसची फी पाच हजारांवरून दहा हजार रुपयांवर नेली गेल्यामुळे अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे ही फी तातडीने मागे घ्यावी आणि पूर्वीप्रमाणे फी घ्यावी अशा मागणीचे लेखी पत्र युवासेना सिनेट सदस्यांच्या वतीने कुलगुरू डॉ. देवानंदजी शिंदे यांना देण्यात आले आहे.यावेळी उपस्थितीत युवासेना सिनेट प्रदीप सावंत, महादेव जगताप, शशिकांत झोरे, राजन कोळंबेकर, धनराज कोहचाडे उपस्थित होते.
Post a Comment