◆२४ व २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपुजन
◆हिंदु हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे तारांगणचे भूमिपुजन
◆रत्नागिरीतील ऍक्टीव्हीटी सेंटरचे उद्घाटन
◆मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील विविध रस्त्यांचे भूमिपुजन
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दोन दिवस रत्नागिरी दौर्यावर येत असून या दौर्यात त्यांच्या हस्ते विविध विकासकामांची उदघाटने तसेच भूमिपूजन करण्यात येणार आहे. २४ व २५ ऑक्टोंबर रोजीच्या आदित्य ठाकरे यांच्या या दौर्यामुळे जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक, युवासेना यांच्यामध्ये चैतन्य निर्माण झाले असून तमाम रत्नागिरीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या कार्यक्रमाला त्यांच्या सोबत रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकरही उपस्थित राहणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी रत्नागिरीकरांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. युवकांचे खंबीर असे आशास्थान म्हणुन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्रातील तरुणाई पहात असल्याने जिल्ह्यातील तरुणांमध्ये उत्साह पसरला आहे. बुधवार २४ ऑक्टोबर रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सकाळी १०.३० वाजता खेड येथील योगिता दंत महाविद्यालयात आयोजित स्त्रीयांचे स्व:संरक्षण विषयक कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.४५ वाजता खेड येथील चिंचघर-तिसे, जामगे सोनारवाडी-कदमवाडी या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. दुपारी २.३० वाजता चिपळुण येथील अकले चोरगेवाडी-जुनावाडा येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे भूमिपूजन, सायंकाळी ४,३० वाजता, चिपळुण येथील मांजरे-कोंढारे, चिवेली तसेच ता गुहागर येथील सायंकाळी ५.३० वाजता गुहागर येथील तळवली भडखंबा-वडद सया भोईवाडी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गुरूवार २५ ऑक्टोबर रोजी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सकाळी १० वाजता रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कुलमध्ये आयोजित स्त्रीयांचे स्व:संरक्षणाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजता हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे भूमिपुजन करण्यात येणार आहे. सुमारे ५ कोटी ५० लाख रुपये खचुर्न मुंबईतील नेहरु तारांगणाच्या धर्तीवर हे तारांगण उभारण्यात येणार आहे.
Post a Comment