हा फोटो नीट पहा. तुम्हाला यात अनेक प्रवृत्ती दिसतील.
माननीय पंतप्रधान इथे एका वृद्ध महिलेच्या पायात चप्पल सरकवतांना दिसत आहेत. तुम्हाला अभिमान वाटेल, आपले पीएम किती सुशील आणि सद्वर्तनी आहेत, डाऊन टू अर्थ आहेत, गरीब आणि मागास-आदिवासींबद्दल त्यांना किती कळवळा आहे..वगैरे.
आता फोटो पुन्हा नीट बघा.. मोदीजी आज्जीच्या पायात चप्पल सरकवत आहेत, आणि आता आपण स्टेजवरील इतर व्यक्तीकडे पाहू.
एक पांढऱ्या ड्रेसमधील इसम पब्लिक कडे बघून त्यांना टाळ्या वाजवायला उद्युक्त करत आहे, म्हणजे, "मोदीजी किती पुण्यकर्म करत आहेत आणि तुम्ही गप्प का राहिलात टाळ्या वाजवा, मोदींची वाहवा करा" या अर्थाने. स्वतः पीएम हे करत असताना त्या पांढऱ्या पोषाखी इसमाला आपण ते काम करू असे वाटले नाही किंवा तो पुढे आला नाही.
तिथं अजून एक लांब केसांचा मनुक्ष आहे जो नुसत्या टाळ्या वाजवत आहे, आणि कौतुकाने मोदींकडे बघत आहे.
याचा सरळ अर्थ असा आहे कि हे केवळ लोकांना दाखवायला केलेलं कृत्य आहे. कारण जर मोदीजी हे काम करत असतील तर त्यांच्या पाठीराख्यांनी त्यांना त्यात मदत करणे अपेक्षित होते, त्यांनी ते काम करण्याऐवजी पब्लिकला उद्युक्त करण्यात धन्यता मानली.
यावरून योग्य तो बोध घ्या..'खोट्या सोन्याला चकाकी जास्त असते'.

Post a Comment

Previous Post Next Post