शेवटी बापाची आठवण आलीच या लोकांना..चार वर्ष सत्तेला चाटत बसणारे काल मुंबईमधे बोंबलत होते.भाडोत्री माणसे जमवून शक्तीप्रदर्शन दाखवित होते आणि 'अफजलखान" हसत हसत टाळ्या बडवित होता.याच अफजलखानाने शिवसेना संपविण्याची सुपारी घेतली होती..
"बालासाहेब नही रहे..खत्म करो शिवसेना को" अशी भाषा अफजलखानाच्या तोंडी होती आणि याच अफजलखानाच्या औलादी आज बाळासाहेबांचा उदो उदो करीत आहेत.एक वर्षात निवडणूक येणार म्हणून यांना आज आमचे "साहेब" आठवत आहेत..
...............................................
प्रमोद महाजन,गोपीनाथ मुंडे,अटलबिहारी वाजपेयी,लालकृष्ण अडवाणी यांचा विसर पडलेल्यांना काल भाजपाच्या वर्धापण दिनादिवशी आठवण आली एरव्ही या लोकांचे पोस्टरवर फोटोसुद्धा नसतात.ज्या लोकांनी भाजपा वाढवली त्यांना विसरून मोदी सरकार "हुकूमशहा" बनित आहेत.साडे तीन वर्षात देशाला गाजर दाखविणार्यांची जनतेसमोर जायची लायकी नाही...ज्या बाळासाहेबांनी यांना मोठे केले त्या साहेबांच्या शिवसेनेशी या लोकांनी मागच्या विधानसभेला काडीमोड घेतला स्वत:च्या स्वार्थासाठी एैनवेळेस दगा केला त्या गद्दारांनी आमच्या दैवताचे नाव तोंडात घेऊ नये.
...............................................
महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक तो अपमान विसरलेला नाही ज्या लोकांनी सत्तेचा वापर करून शिवसेनेला दुय्यम वागणूक दिली..जनतेच्या भल्यासाठी आम्ही आजपर्यंत सहन करीत आलो आहोत..सत्तेला लाथ मारायची असती तर केंव्हाच मारली असती परंतू हे भाजपाचे लोक आमच्या नावावर तमाशा करीत बसले असते आणि पुन्हा एक हाती सत्तेवर आले असते..
शिवसेनेला आता मलमपट्टी लावायची गरज नाही...आम्ही आता युती करणारच नाही.शिवसेना स्वबळावर लोकसभा आणि विधानसभा लढवेल.
..............................................
मुंबईमधे भाजपाचा वर्धापण दिन होता आणि सोलापूरात राष्ट्रवादीचा "हल्ला बोल" मोर्चा होता.आजपर्यंत महाराष्ट्रातील जनतेच्या पैशावर उतमाज करणार्यांना हल्ला बोल आंदोलन करण्याचा काय अधिकार..? हल्ला बोल आंदोलनामधील नेते सिंचन घोटाळ्यात
"हिटलिस्टवर" आहेत कधीही त्यांना अटक होऊ शकते परंतू भाजपा व राष्ट्रवादीची आतून सेटलमेंट आहे म्हणूनच तर भ्रष्टाचारी नेते बाहेर मोकाट आहेत.
..................................................
कालच्या सोलापूरच्या "हल्ला-बोल" आंदोलनात धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला लाचार म्हटले..त्या धनंजय मुंडेला मी सांगू इच्छीतो कि दुसर्याला लाचार म्हणण्या-अगोदर आपण किती "स्वाभिमानी" आहोत याचे जरा आत्मपरीक्षण करावे..इतक्या वर्ष भाजपा बरोबर तुम्ही लाचारी केलात..स्वत:च्या चुलत्याला धोका दिलात..स्वत:च्या बहिणीच्या विरोधात उभारून रपटी खाल्लात..यालाच स्वाभिमान म्हणतात का..? याला लाचारीच म्हणतात.तुमची लाचारी तुम्हाला लख लाभो आम्हाला लाचारीचे धडे कोणी शिकवू नये. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पंधरा वर्ष सत्तेत होते..पंधरा वर्षात महाराष्ट्रातल्या हजारो शेतकर्यांनी आत्महत्या केल्या त्यावेळेस कॉंग्रेसबरोबर राष्ट्रवादीने लाचारी का केली..?? का पंधरा वर्ष कॉंग्रेस बरोबर राहिलात..? आणि आता सत्तेत नाही म्हणून दुसर्याला लाचार म्हणता यावरूनच तुम्ही सत्तेशिवाय जगु शकत नाही हे सिद्ध झाले आहे..पाण्यापिना तडपडणार्या माशासारखी तुमची गत झाली आहे..शिवसेना हा अंगार आहे कितीही आरोप झाले तरी त्या आरोपातून तापून सुलाखून तप्त अग्निसारखी शिवसेना त्वेषाने पेटून उठेल आणि या महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवरायांचा भगवा फडकावेल.
जय महाराष्ट्र.

..............जय बाळासाहेब...............

        अतुल श्रावण भवर,सोलापूर.

            मो.नं.9960090001.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Post a Comment

أحدث أقدم