पालिकेच्या ‘प्रतीक्षानगर-शीव’ वॉर्ड क्र. १७३ मध्ये पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या रामदास कांबळे यांनी दिमाखदार विजय मिळवला आहे. कांबळे यांनी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेट्टी यांना ८४५ मतांनी पराभूत करत सहजपणे विजय मिळवला. ही निवडणूक घोषित झाल्याच्या दिवसापासूनच शिवसेनाच इथे विजयी होणार हे निश्चित मानले जात होते. शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनामुळे झालेल्या या पोटनिवडणुकीत शिवसेनेवर या प्रभागातील लोकांचा विश्वास कायम असल्याचं सिद्ध झालं.
हा विभाग गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा गड राहिल्यामुळे यावेळीही इथे शिवसेनेचा एकतर्फी विजय होणार अशी खात्री जाणकार व्यक्त करीत होते. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुनील शेट्टी व भारिपचे गौतम झेंडे मैदानात होते. गेली ३२ वर्ष शिवसेनेने या विभागात केलेली विकासकामे आणि लोकांशी सातत्याने असलेला संपर्क ही शिवसेनेची जमेची बाजू होती. भाजपनेही शिवसेनेला या मतदारसंघात पाठिंबा दिला होता ज्यामुळे रामदास कांबळे यांचा विजय झाला.
إرسال تعليق