शिवसेनेच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले. पालिकेच्या क्रीडा स्पर्धांसाठी मैदानांचे भाडे प्रतिदिन २७ हजारांवरून थेट ६१० रुपये करून घेण्यात अखेर शिवसेनेला यश मिळाले. पाच हजार चौरस मीटर पेक्षा जास्त जागेला प्रतिदिन २४२० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे तसेच  ५०० चौरस मीटरपेक्षा कमी जागेला १२१० रुपये अनामत रक्कम व ३०८ रुपये भाडे भरावे लागणार आहे. यामुळे क्रीडा स्पर्धा आयोजकांना दिलासा मिळाला आहे.

महानगर पालिकेने खेळांच्या स्पर्धांसाठी मैदानांचे भाडे २ नोव्हेंबर २०१५च्या परिपत्रकानुसार दिवसाला ५०० ते १००० चौ. मी.ला प्रतिदिन १५,५०० आणि १००० चौ. मी. पेक्षा जास्त जागेला २७ हजार भाडे वसूल करण्यात सुरुवात केली होती. तर सात दिवसांकरिता ५१ हजार भाडे वसूल करण्यात येत होते.या पार्श्वभूमीवर सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. यानंतर महापौर विश्वनाथजी महाडेश्वर यांनी पालिका प्रशासनाला आदेश दिल्यावर मैदानासाठीचे भाडे कमी करण्यात आले. यासाठी शिवसेना आमदार अॅड. अनिल परब यांच्यासह शाखाप्रमुख नितीन डिचोलकर यांनीही पाठपुरावा केला.

Post a Comment

أحدث أقدم