गांडुळास दोन तोंडे आहेत की चार तोंडे याचा शोधनंतर लावू, पण तुम्ही मात्र रावणाप्रमाणे दहा तोंडांनी बोलत असता पण प्रश्न इतकाच आहे की, शिवसेना सत्तेत राहून काय केले असा प्रश्न तुम्हा सर्वांना पडाला आहे, पण इतकी वर्षेसत्तेच्या खुर्च्या उबवून फक्त स्वतः साठीचे हितसाधण्यापलीकडे आपल महाराष्ट्रासाठी नक्कीयोगदान आहे तरी काय? जेंव्हा शेतकरी हक्काचे पाणी मागण्यासाठी तुमच्याजवळ आला तेव्हा तुम्ही त्यांना‘मूत्र’ पाजण्याची भाषा केली होती,हेच आहे का? तुमचेशेतकरीप्रेम! मग त्या अर्थाने तुम्हाला दुतोंडी(मांडूळ) साप म्हणणे हा त्या सापाचाही अपमान ठरेल करण सापही शेतकऱ्यांचा मित्रच असतो. तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असे म्हणल्यास गैर नाही.
अजित पवार यांचे राजकारण केवळ बारामती पुरतेसुद्धा राहिलेले नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी अजित पवारांना जवळजवळ माती खायला भाग पाडलं होत. बरेच दिवस अजित पवार त्या मातीत गाडलेले आपले तोंड बाहेर काढायला सुध्दा तयार नव्हते. महापालिका निवडणुकीमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवडचे संस्थानही धुळीस मिळाल्या गत जमा आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांच्या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदही ठेवलेले नाही. राष्ट्रवादी पपक्षाचा जीर्ण सांगाडा झाला आहे. तरीही हे सांगाडे ‘हल्लाबोल’ मोर्च्यांच्या नावाखाली उसणे अवसान अंगात आणत आहेत हा विनोदच म्हणाटला तरी चालेल.
महाराष्ट्रामधील राजकारणात सध्या अजित पवारांची पत ती काय, पण तरीही त्यांच्या जिभेचा गांडूळ अधूनमधून वळवळ करत असतोच. नुकत्याच झालेल्या सभेत त्यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेची संभावना ‘गांडुळाची अवलाद’ अशी केली होती. शिवसेनच्या गांडुळाचे तोंड इकडे की तिकडे कळत नाही असे ते म्हणत होते. आता आमच्या गांडुळाचा मुका घेण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी कधी केला हे त्यांनी एकदा सांगून टाकले तर हरकत नाही. अजित पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी सुद्धा गांभीर्याने दखल घेत नाही. त्यांना मिळत असलेला मानसन्मान आतापर्यंत मिळाला तो त्यांच्या आदरणीय काकांमुळे म्हणजेच मा.श्री शरद पवार यांच्यामुळेच. पण काकांनी दिलेल्या संपूर्ण संधी व संपूर्ण पाठबळ देऊनही अजित पवारला नेतृत्व उभे करता येत नाही. कारण त्यांचे तोंड व जीभ म्हणजे भ्रष्ट गटार आहे व येणाऱ्या-जाणाऱ्यांवरती त्यांच्या भ्रष्ट असलेल्या गटारी तोंडाने थुंकून ते घाण करीत बसत आहेत. मा.शरद पवार यांनी जे पन्नास वर्षांत कमावले ते अजित पवारांनी अल्पावधीत गमावल्यामुळेच शरद पवारांना ७५ व्या वर्षीसुद्धा पक्षबांधणीसाठी कसरत कराण्याची गरज पडत आहे.
ऐवढाच का तुमचे शेतकरीप्रेम! मग असे असेल तर तुम्हाला दुतोंडी साप म्हणणे हा त्या सापाचाही बदनामी होईल त्यामुळे तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या त्या छिंदमची अवलाद आहात असे म्हणावे लागेल. जो गुन्हा त्या नालायक छिंदमने केला तोच गुन्हा मंत्रीपदावर असताना तुम्ही देखील केला. तुम्ही सत्तेत होता तेंव्हा काही केले नाही व आता विरोधी पक्षात असतानाही तोंडास बूच मारूनच बसले आहात. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असल्यापासूनच शिवसेना जीवाचा रान उठवीत होती आणि आता सुद्धा भाजप सत्तेवर आला तरी शिवसेनेने कर्जमाफीचा नारा सोडला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आवाज चढवून शेतकऱ्यांची कर्जमाफी शिवसेनेने करून घेतली आणि सत्तेत राहुन महाराष्ट्राच्या व जनतेच्या हितासाठी आवाज उठविण्याचे काम शिवसेनाच एका कर्तव्यभावनेने करीत असते व या पुढेही राहील.
जेंव्हा तुम्ही १५ वर्षे सत्तेत खुर्च्या उबवीत बसला होतात तेव्हा तुम्ही महाराष्ट्रहितासाठी काय दिवे लावले व किती दिवे लावले? जमीन घोटाळे व पाणी घोटाळे या व्यतिरिक्त दुसर काही केलात का? पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेंव्हा जलसंधारण घोटाळय़ाचे स्फोट झाले होते तेव्हा ‘तो मी नव्हेच’ अशा सुरातही तुम्हालाही मंत्रिमंडळातून बाहेर पडता येऊ शकले असते. पण दुतोंडी सापा प्रमाणे काँग्रेजी चिखलात सत्ता उबवीत वळवळत करतच राहिलात ना? आजही ह्याच जलसंधारण भ्रष्टाचाराच्या चौकशीचा आळ गळ्याभोवती आवळला जाण्याची भीती असल्यामुळेच काही कारण नसता शिवसेनेवर चिखलफेक करत आहात व दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली मंत्रीपद गमावलेल्या खडसेंच्या पायाचे तीर्थ प्राशन करत आहात. आज महाराष्ट्रात सरकार शिवसेनेचे नसले तरी ते २०१९ साली नक्कीच येईल तेव्हा मात्र या शेतकऱ्यांच्या जीवनात ‘मूत्र’ कालवणाऱ्या अश्या भ्रष्ट छिंदम अवलादीच्या पवारांची गय केली जाणार नाही. अजित पवारांची जागा त्यांच्या भ्रष्ट मित्रमंडळात बसलेल्या भुजबळांबरोबर तुरुंगातच आहे. ह्याच भीतीमुळे भाजपचे ‘बूट’ चाटीत असलेले हे महाशय शिवसेनेवर हल्ला करीत आहेत. अजित पवारांवर लिहिण्यायोग्य बरेच काही आहे, पण त्या गटारीसाठी ‘सामना’ मध्ये इतकी जागा देण्याची गरज नाही व तेवढी त्यांची लायकी सुद्धा नाही. ज्या काँग्रेस पक्षाशी २०१४ साली निवडणूक युती तोडलीत त्याच काँग्रेसबरोबर अजित पवार पुन्हा का हाथ मिळवू पाहत आहेत? हे फक्त दुतोंडी गांडुळांनाच हजमू शकते,स्वतःला सांभाळा,तुमच्या नेतृत्वाचे विमान कधीच उडाले नव्हते. या विमानाची चाके जमिनीवरच आहेत, तुमचे डोके वेगळ्यास दिशेने जात आहे.डोके तपासून घ्या, नीट असलेल्या डोळ्यांनी पहा तुमचा छिंदम झाला आहे!
إرسال تعليق