गोरख गोपाळ खर्जुल या नाशिकच्या एका नागरिकाने एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन औवेसी यांच्यावर हल्ला केल्याचं बोललं जातंय. ते नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचा समर्थक असल्याचा दावा गोरख यांनी केला आहे.
उलट उत्तर दिल्याने खासदार असद्दुदीन ओवैसींच्या कानाखाली वाजवली असल्याचं गोरख यांचं म्हणणं आहे. १ ते २ च्या मध्ये हा प्रकार संसदेच्या परिसरात घडला असल्याचं गोरख यांनी सांगितलं.
हा प्रकार संसद भवनातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचा दावाही खर्जुल याने केला आहे. माझ्याकडून असा प्रकार घडला असल्याची कबुली खर्जुल याने प्रसारमाध्यमांना फोन करून दिली. एक हिंदुत्ववादी रक्त माझ्यामध्ये सळसळतय त्यामुळे मी हा प्रकार केल्याचा दावा त्याने केला आहे. मी जे काही केले आहे ते काही चूक केले नाही. मी ओवेसींना मारले तर महाराष्ट्रातील जनतेला आनंदच झाला असेल असा दावाही त्याने केला आहे.
إرسال تعليق