महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दमदार तसेच एकमेव आमदार आणि सध्याचे भाजपाचे सहयोगी सदस्य जुन्नरचे शरद सोनवणे हे शिवसेनेच्या मार्गावर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी आज नवी दिल्ली येथे शिवसेना नेत्यांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या पुढील लोकसभा निवडणुकीसाठी नारळ फोडण्यात सुरुवात केली आहे.
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार राजन विचारे यांच्या गाटी भेटी त्यांनी केल्या असून त्यांच्यासोबत खेड शहराचे दमदार आमदार सुरेश गोरे हे देखील उपस्थित होते. दोन्ही आमदारांनी लोकसभेच्या सभागृहात खासदारांच्या आसनांवर स्थानापन्न होत खासदार आपण झाल्याचेही स्वप्न पूर्ण करुन घेतले.
सोनवणेच्या या शिवसेना नेत्यांच्या गाठीभेटींमुळे तालुक्यात सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे, तालुक्यामधून आमदारकीसाठी शिवसेनेकडून दावेदार असणार असणारे आशा बुचके, माऊली खंडागळे यांचा या भेटीमुळे हिरमोड झाल्याची चर्चा आहे.
स्वाभिमान संघटनेतुन आपला राजकीय जीवन प्रवास सुरु करणारे आमदार साेनवणे हे पुर्वाश्रमीचे शिवसेनेचे शिवसैनिक होते. त्यांना २००९ च्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती,मात्र जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी आदल्या दिवशी सोनवणे यांचे तिकीट रद्द करीत स्वतः उमेदवारी मिळविली होती.अश्या वागण्याने राष्ट्रवादीचे वल्लभ बेनके विजयी झाले होते. यानंतरच्या २०१४ च्या निवडणुकीमध्ये आमदार सोनवणे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे निवडणुक लढवत, राज्यातील एकमेव उमेदवार म्हणुन निवडुन येण्याचा मान राखला. यांनतर मात्र ते भाजपाचे सहयाेगी सदस्य झाले.
आता येत्या २०१९ लोकभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा शिवसेना प्रवेशाची चर्चा अनेक दिवस तालुक्यात हाेत आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी सोनवणे हे खासदार आढळराव यांच्या उपस्थितीत असलेल्या एका कार्यक्रमाध्ये याबाबतचे संकेत दिले होते. खासदार आढळराव यांनी पुणे-नाशिक रेल्वे प्रश्न मार्गी लावल्याची तेव्हा चर्चा होत होती. हा मुद्दा पकडत सोनवणे म्हणाले होते की,खासदारांनी आपला रेल्वे मार्ग ट्रॅकवर लावला त्यामुळे आता माझे इंजिन भाजपच्या रुळावर न्यायचे की धनुष्याच्या याचाही त्यांनी निर्णय घेऊन टाकावा.तेंव्हाच्या त्यांच्या वाक्याचा अर्थ आज खऱ्या अर्थाने उलगडला.
त्यांच्या आजच्या दिल्लीत झालेल्या भेटीगाठींमुळे शिवसेना प्रवेश नक्की झाल्याची चर्चा दिसून येत आहे, आमदारकीची स्वप्ने पाहत असलेल्या आशाताई बुचके आणि माऊली खंडागळे यांचा मात्र या भेटीगाठींमुळे नाराज झाल्याचे सध्याचे वातावरण आहे. मात्र आणखीन अधिकृत पक्ष प्रवेश झाला नसल्याने सध्या तरी सर्वजण सावध होत असून, एेन प्रसंगी काय घडामाेडी घडतील यावर २०१९ मध्ये शिवसेनेचा उमेदवार काेण असेल, हे ठरणार आहे.
إرسال تعليق