आगामी निवडणूक तोंडावर येताच राजकीय पक्षांच्या नेत्यांची धर-सोड सुरु होते. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनालाही आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या मैत्रीला जागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलेल्या शिंदे यांनी भांडुप विधानसभेत विजय मिळवला होता. मात्र शिंदे इंजिनाची साथ सोडून धनुष्यबाण हाती घेणार असल्याचे वृत्त आले आहे.

मनसेने पक्ष वाढीसाठी आणि संघटना बांधणीसाठी लक्ष केंद्रीत करत आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर गेले आहेत.

काही दिवसांपूर्वी बीकेसी येथील एका लग्नसमारंभात उद्धव ठाकरे आणि शिशीर शिंदे यांची भेट झाली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बराचकाळ चर्चाही झाली होती. हा सगळा घटनाक्रम पाहता शिशीर शिंदे लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी राम कदम आणि प्रवीण दरेकर यांसारखे बडे नेते मनसेतून बाहेर पडले आहेत. काही महिन्यांपूर्वीच मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आता शिशीर शिंदेंसारख्या जुन्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्यास मुंबई उपनगरात मनसेला आणखी एक मोठे खिंडार पडेल.

शिशीर शिंदे

राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरु1992 साली ते मुलुंडमधील शिवसेनेचे नगरसेवकशिवसेनेकडून त्यांना उपनेतेपद शिवसेनेच्या अनेक आंदोलनांमधील त्यांचा सहभाग कायमच चर्चेचा विषयबाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी वानखेडे मैदानाची खेळपट्टी उखडलीशिशीर शिंदेंनी 1991 मध्ये वानखेडे मैदानाची खेळपट्टी उखडली1996 ते 2002 या काळात ते विधानपरिषदेचे सदस्यत्यांनी 2006 मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश2009 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेच्या तिकीटावर विजयशिशीर शिंदे हे मनसेचे विद्यमान सरचिटणीस

 राज यांच्या जवळच्या वर्तुळातील नेते म्हणून शिशीर शिंदे यांचा लौकिक होता. मात्र, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्यावेळी निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवल्याने शिशीर शिंदे पक्षावर नाराज होते. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून, मनसेच्या नेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती केली होती. गेल्या काही दिवसांपासून शिशीर शिंदे हे मनसेच्या विभागवार बैठका आणि कार्यक्रमांपासून दूर राहत होते.
वरील माहिती जय महाराष्ट्र न्युज द्वारा प्रसारित केली गेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post